Product Summery
Long printed dress with thin adjustable straps. V-neckline and wiring under the Dust with ruffles at the bottom of the dress.
गौतमीपुत्र कांबळे यांचे 'जयंती' हे पुस्तक म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर दहा वर्षांच्या अंतराने बदलत गेलेल्या जयंती महोत्सवाच्या स्वरूपावरील एक भेदक एक्स-रे रिपोर्ट आहे. धम्मक्रांती म्हणजे कार्ल मार्क्सपेक्षा अधिक निर्दोष असं जग बदलण्याचं क्रांतिकारी धम्म तत्त्वज्ञान । त्यातला आशय पुढील काळात कसा धूसर होत गेला आणि एका प्रतिक्रांतीला कसा जन्म देता झाला, यासंबंधी अत्यंत प्रामाणिक आणि तटस्थपणे या पुस्तकामधून कांबळे यांनी उपहासान्मक, मार्मिक भाष्य केले आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर धम्माला, विधी व परंपराग्रस्त धमचेि रूप कसे प्राप्त होत गेले हे दाखवून दिले आहे. तसेच उजव्या व डाव्या दोन्ही स्वरूपाच्या पोथिनिष्ठ विचारांची धम्मक्रांतीशी नेत्यांनी तत्त्वहीन सांगड घालत केलेल्या तडजोडीमुळे बाबासाहेबांना मानणारा समाज कसा भरकटत चालला आहे, याचे भेदक दर्शन पहिल्या चार 'जयंती'मधून लेखकाने घडविले आहे, तर पाचवी जयंती एक लोभस स्वप्न आहे. डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या विचारातली धम्मक्रांती आणि त्याद्वारे समताधिष्ठित समाज घडविण्याचे स्वप्न धम्मनगर या नव्याने वसवलेल्या गावात कसे साकार झाले याची रोचक कहाणी आहे. या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार आणि धम्मानुसार वर्तन करून गावकरी रोजच जयंती कशी साजरी करतात हे ५ व्या जयंतीमधलं चित्र प्रत्यक्ष साकार व्हावं, ही लेखकाची तीव्र मनीषा आहे, तिच्याशी विचारी वाचक नक्कीच सहमत होईल. एकूणच 'जयंती'मध्ये दर दहा वर्षांनी साजऱ्या होणाऱ्या जयतीमधून बाबासाहेबांच्या पश्चात धम्मक्रांतीची चळवळ कशी निस्तेज होत गेली हे नेमकेपणाने लेखकाने टिपले आहे. समाजात पुन्हा धम्मक्रांतीचे क्रांतिकारी तत्त्वज्ञान रुजावे व समता-बंधुता प्रस्थापित व्हावी, हा सम्यक विचार या पुस्तकाचा मध्यवर्ती गाभा आहे. नेमकी दिशा देणारे व धम्मक्रांतीसाठी समाजमन घडविण्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडेल हे नक्की. मराठी साहित्याच्या ललित लेखनाच्या साऱ्या रूढ चौकटी मोडून एक नया साहित्य प्रकार, ज्याला मी कथेची रंजकता आणि लेखाची वैचारिकता असलेला 'कथालेख' म्हणेन, असा नवा साहित्य प्रकार गौतमीपुत्र कांबळे यांनी दिला आहे, त्याचे मराठी वाचक आणि धम्मक्रांतिप्रेमी निश्चित स्वागत करतील. लक्ष्मीकांत देशमुख अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बडोदा.