Product Summery
Long printed dress with thin adjustable straps. V-neckline and wiring under the Dust with ruffles at the bottom of the dress.
मानवी जीवनात कळत-नकळत प्रवेशणारी संस्था म्हणजे रुग्णालय-हॉस्पिटल ! आज घडीला अत्यंत वादग्रस्त, परंतु तितकीच गरजेची असणारी ही संस्था प्राचीन काळापासून दुःखमुक्तीचे एक केंद्र म्हणून कार्यरत आहे जीवक व सुश्रुताच्या परंपरेतील अनेक डॉक्टर आजही त्याच निष्ठेने आपले सेवा कार्य करताहेत त्यांना अनेक कुशल अकुशल तंत्रज्ञांची मदत होत आहे. परंतु अंतिमतः ही सारी माणसेच आहेत. गुण आणि दोष असणारी, स्वतःची सुख-दुःखे, व्यथा-वेदना असणारी. आपण या सर्वांकडे एका रुग्णाच्या किंवा ग्राहकाच्या नजरेने पाहतो. परंतु डॉ. रवींद्र श्रावस्ती हे हॉस्पिटलकडे दुःखमुक्तीचे जीवनदायी केंद्र म्हणून पाहतात. व्यथा-वेदना घेऊन येणारी व ती दूर करण्यासाठी अहोरात्र झटणारी माणसे नीटपणे समजून घेऊन, शब्दांतून मांडण्याचे गुंतागुंतीचे काम येथे लेखकाने ललित स्वरूपात केले आहे. या लेखनात बुद्धाचा दुःख स्वीकारण्याचा आणि त्यातून मुक्त होण्यासाठी झगडण्याचा विचार आहे आणि त्याला कारुण्याच्या भावनेची जोड आहे. म्हणून हे लेखन मेडिको व नॉनमेडिको वाचकांसाठी महत्त्वपूर्ण व अनुभवसंपन्न बनविणारे आहे.