अंतःस्पर्श हे पुस्तक म्हणजे वाचनानुभवाच्या गर्भात उतरून शब्दांच्या सूक्ष्म स्पंदनांचा शोध घेणारी एक चिंतनशील साहित्ययात्रा आहे. मराठी साहित्यातले ऐंशी-नव्वदचे दशक हे सामाजिक, वैयक्तिक आणि भाषिक दृष्टिकोनातून परिवर्तनाचे पर्व ठरले. या काळातील पंचवीस साहित्यिकांच्या लेखनाशी संवाद साधत, त्यांच्या संवेदनांचा, शैलीचा आणि आशयाचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. हे केवळ समीक्षण नाही, तर त्या काळातल्या शब्दांचा, भावना-प्रवृत्तींचा, आणि अंतर्मनाला भिडणाऱ्या क्षणांचा 'अंतःस्पर्श' आहे. लेखकाने ललित लेखनाची सौंदर्यदृष्टी आणि अभ्यासकाच्या सजगतेने या प्रवासात वाचकाला सहभागी करून घेतलं आहे. या लेखनातून साहित्याचे केवळ अर्थ नव्हे तर त्यामागचा स्पर्श. एक गूढ, जाणिवशील अनुभव वाचकाला नव्याने भिडतो. "अंतःस्पर्श" हे पुस्तक म्हणजे अंतर्मनाच्या संवेदना जाग्या करणारा शब्दांचाच एक आरसा आहे. - दिलीप भोसले सीईओ दिभो सन्स भारतीय चित्रपट लेखक दिग्दर्शक www.dibho.com