माझ्या छोट्या मित्रांनो, तुम्ही कधी आकाशाकडे बघून विचार केला आहे का? “मीसुद्धा पक्ष्यासारखा उडू शकलो तर?” किंवा पावसात धावताना मनात आलंय का? “मीसुद्धा इंद्रधनुष्याचा रंग बनू शकलो तर?” हे पुस्तक अशाच स्वप्नांची गोष्ट आहे. "स्वप्नांचे पंख" मध्ये तुम्हाला भेटतील मजेदार आणि खास मित्र एक छोटं पाखरू जे उडायला शिकतं, एक छोटासा पाण्याचा थेंब जो इंद्रधनुष्य रंगवतो, आणि अजून कितीतरी! या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी एक छोटसं गुपित सांगतात. तुमच्यामध्ये एक जादू आहे! तुम्ही लहान असलात तरी तुमची स्वप्नं मोठी असू शकतात, आणि प्रयत्न, धैर्य आणि चांगुलपणाने ती पूर्ण होऊ शकतात. मला फक्त एवढंच हवं आहे. तुम्ही हे पुस्तक वाचाल, हसाल, स्वप्नं पाहाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल. चला तर मग, पानं उलटा… आणि तुमच्या स्वप्नांना पंख द्या! तुमची मैत्रीण, शितल भोसले