देशभक्त शाखज्ञ डॉ. होमी भाभा १९५१ सालची गोष्ट. भारतीय विज्ञान परिषदेचे अधिवेशन बेंगलोर येथे भरलेले होते. संपूर्ण भारत देशातूनच नव्हे, तर जगातील प्रगत राष्ट्रातील थोर थोर शास्त्रज्ञ या अधिवेशनसाठी हजर होते. अत्यंत विद्वान आणि थोर मंडळी शिवाय हजारोंच्या संख्येने शिक्षक, विद्यार्थी या अधिवेशनात हजर होते. या अधिवेशनाचे उद्घाटन भारत देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. पंडितजींचे भाषण देशाची प्रगती आणि परंपरा सांगणारे झाले. त्यानंतर या अधिवेशनाचे अध्यक्ष भारत देशातील अत्यंत बुद्धिमान आणि देशावर जीवापाड प्रेम करणारे शास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा हे बोलायला उभे राहिले, डॉ. भाभा काय बोलतात हे ऐकण्यासाठी जगातील सर्व शास्त्रज्ञांचे मन आतूर झाले.