स्वातंत्र्यप्राप्तीच्या मतरलेल्या कालखंडात आपल्या कार्यकर्तृत्वाने आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरणारे क्राति अग्रणी डॉ जी. डी. बापू लाड याची ही मुलांच्यासाठी लिहिलेली चरित्रात्मक कादबरी आहे. डॉ जी. डी. बापू लाड हे बुद्धी, नीतिमत्ता आणि धाडस याचा समतोल साधणारे क्रांतिकारक होते क्रांतिसिंह नाना पाटील हे त्यांचे दैवत होते. सातारा जिल्ह्यात सुरू केलेले प्रतिसरकार याचे ते प्रमुख सेनापती होते. त्यानी निर्मिलेली 'तुफान सेना' भारत देशात प्रभावी होती. सर्वसामान्य शेतकरी वर्गाला सुखाचे दिवस लाभावेत म्हणून सारे जीवन त्यांनी समर्पित केले. रघुराज मेटकरी या ४१ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य समेलन भरविणाऱ्या आदर्श शिक्षक साहित्यिकाने डॉ. जी डी. बापू लाड याच्यावर लिहिलेले हे पुस्तक माय मराठीत अभिमानास्पद शोभेल, असा विश्वास वाटतो. लक्ष्मीकांत देशमुख ज्येष्ठ साहित्यिक पूर्वाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य समेलन