या महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्मलेले, आणि या समाजाला जाग यावी, या समाजातील निरक्षर, अंधश्रद्धेला कवटाळून बसलेले, व्यसनाने घरपण हरवलेले, कर्जबाजारी लोक यांना सुखाचे दिवस भेटावेत यासाठी रात्रंदिवस किर्तन, प्रवचने देऊन माणसाचे जग सुखी, आनंदी व्हावे म्हणून झटणारे गोरगरीब, आदिवासी, भटक्या गावाबाहेर पालात राहाणाऱ्या लोकांच्या मुलांना संत गाडगे महाराजांच्या नावाने अनेक अनाथ आश्रमशाळा काढून त्याना शिक्षण देऊन समाजात उच्चस्थान मिळवून देणारे, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन तुरुंगवास भोगणारे, आणि मी माझ्या मातृभूमीचे काम केले ते पेन्शनसाठी नाही म्हणून स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन नाकारणारे, संत गाडगे महाराजांचे आवडते शिष्य स्वातंत्र्यसेनानी जिजाबा मोहिते पाटील-सोहोलीकर महाराज या राष्ट्रीय कीर्तनकारांची साहित्यिक रघुराज मेटकरी यानी लिहिलेली अत्यंत रसाळ, उत्कंठा वाढविणारी ही चरित्रात्मक बाल कादंबरी प्रत्येकाने वाचावी अशी आशा आहे. मुलांच्यासाठी तर हा संस्कारक्षम अमूल्य ठेवा आहे. प्रा. इंद्रजित भालेराव ज्येष्ठ साहित्यिक (परभणी)