रघुराज मेटकरी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. पद्मश्री पु. ल. देशपांडे यांचे प्रेम व आपुलकी मिळवलेला ग्रामीण साहित्यिक. शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवलेले मनस्वी शिक्षक. साहित्य, संस्कृती, सुविचारांचा प्रसार ग्रामीण भागात व्हावा म्हणून गेली ४१ वर्षे झपाटून प्रतिवर्षी आपल्या विटे गावी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरविणारे माझे ध्येयवेडे मित्र. रघुराजच्या अनेक कादंबऱ्या, कविता, कथा, बालवाङ्मयाची पुस्तके, ललित निबंध, थोरांची चरित्रे प्रकाशित आहेत. यातून त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. महाराष्ट्राचे लाडके क्रांतिकारक, लोकनेते, पद्मभूषण वसंतरावदादा पाटील यांच्या बहिरंगाचा व अंतरंगाचा वेध या पुस्तकात त्यांनी घेतलेला आहे. बालवाचकांना ही चरित्र कादंबरी खूप आवडेल, याची मला खात्री वाटते. विश्वास पाटील सुप्रसिद्ध साहित्यिक व ज्येष्ठ कादंबरीकार