भारतीय राजकारणी आणि प्रख्यात अभ्यासक भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मातील जाचक रूढींना कंटाळून १४ आक्टोबर १९५६ रोजी आपल्या अनुयायांना सोबत घेऊन बुद्ध धम्माचा स्विकार केला. तत्पूर्वी लिहलेला 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि तत्वज्ञानावर आधारित असणारा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर १९५७ साली सिध्दार्थ काॅलेज पब्लिकेशन, मुंबई यांनी प्रकाशित केला. सदर ग्रंथ बौद्ध अनुयायांसाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतो आहे.