श्री मायाक्का देवी ही ब्रम्हांडाचे रक्षण करणारी साक्षात महाशक्ती महाकालीचे दिव्य रूप आहे. दृष्ट शक्ती पासून आपल्या भक्तांचे रक्षण करावे, त्यांच्या प्रगतीत त्यांना योग्य मार्ग दाखवावा, भक्तांना सदबुध्दी द्यावी, भक्तांचे कल्याण करावे त्यांना छळणाऱ्या दुष्ट शक्तींचा, अपप्रवृत्तींचा नायनाट करावा म्हणून देवीचा अवतार आहे. सज्जनांना वरदान आणि दुष्टांचे निर्दालन हे देवीचे सत्यव्रत आहे.