आजपर्यंत आपण कथा, कादंबरी, कविता इत्यादी साहित्याची पुस्तके आणि त्यावरील समीक्षा मोठ्या प्रमाणात वाचल्या आहेत पण माहुली जिल्हा - सांगली सारख्या ग्रामीण भागातील सचिन अवघडे यांनी २५ वर्षाचा कामाचा दीर्घ अनुभव घेऊन एक हटके पुस्तक लिहिलेले आहे. ते पुस्तक म्हणजे एक अनुभवामृत आहे. 'वाटचाल सक्षम ऑटो स्प्रे पेंटर घडविण्याची' या पुस्तकाच्या नावातूनच उद्देश स्पष्ट झालेला आहे. साहित्य लिहिण्याची उर्मी जशी असावी तसेच आपण घेतलेला कामाचा अनुभव अतिशय तरलपणे सोप्या भाषेत प्रकट करण्याची किमया या ग्रंथाचे लेखक सचिन अवघडे यांनी साधलेली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे त्यांच्या या लेखनाची प्रेरणा आहेत. दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ जर ३०-४० कादंबऱ्या, लोकनाट्य, कथा, चित्रपट कथा लिहित असतील तर आपण का नाही? हे सारे या पुस्तकाच्या मुळाशी आहे.
लेखक सचिन अवघडे यांच्या साहित्यिक वाटचालीस आभाळभर शुभेच्छा...