दिवसेंदिवस मातीचा ढिगारा वाढत होता. इकडे जवळचा खड्डा अधिकाधिक खोल जात होता. मातीचा ढिगारा उन्मादाने हसून म्हणाला, 'तू अजून तिथंच ? बघ, मी किती ऊंच गेलो आहे. आता आभाळाला टेकतील माझे हात !' खड्डा ओरडून काही सांगू पाहात होता. पण त्याचा आवाज वरपर्यंत पोहोचत नव्हता. दबत्या गेलेल्या क्षीण आवाजाच्या पण तीव्र भावनेच्या या लघुत्तम कथा... 'सूर्य, देव आणि माणूस'. माणूसपणाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवू पाहतायत.