Kathakand

Kathakand


Book Preview


₹120.00 ₹150.00
Price in USD: $1.37

'कथाकंद' :- अनुभवांची, वास्तवाची आणि भावविश्वाची जडणघडण साहित्याच्या अथांग समुद्रात पहिले पाऊल ‘सुमनांजली’ या चारोळी संग्रहाने टाकले आणि त्यानंतर सुरू झालेला डॉ. राजश्री पाटील यांचा साहित्य प्रवास आज अनेक मुक्काम पार करून एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचला आहे. ‘तिच्यातली ती’ या कथासंग्रहाने त्यांना लेखक म्हणून स्वतंत्र ओळख दिली, ‘बोचऱ्या सुया’ मधील मेडिकल क्षेत्राशी निगडित अनुभवकथनांनी जीवनाच्या नाजूक बाजू उलगडल्या, तर ‘ती अजूनही जळत आहे’ या कवितासंग्रहाला लाभलेल्या पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यिक वाटचालीला गती दिली. या प्रेरणेतूनच जन्माला आलेला कथासंग्रह म्हणजेच ‘कथाकंद’. डॉ. पाटील यांनी वेळोवेळी लिहिलेल्या कथा वेगवेगळ्या अंकात, स्पर्धांमध्ये आणि वाचनमंचांवर प्रकाशित झाल्या. ‘मोडला संसार मोडला नाही कणा’ ही महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळवलेली कथा असो वा ‘वटपौर्णिमा’, ‘साखळदंड’, ‘एक रात्र कृष्णाचे पात्र’ यांसारख्या विविध दिवाळी अंकातील कथा. त्यांच्या लेखनात वास्तव, भावविश्व आणि मानवी नात्यांची गुंतागुंत ठळकपणे दिसते. या संग्रहातील कथा म्हणजे जीवनाच्या असंख्य छटा. ग्रामीण ते शहरी, बोलीभाषा ते आधुनिकतेचा प्रभाव, कुटुंबव्यवस्थेतील संघर्ष ते सामाजिक बदलांची छाया. ‘साखळदंड’ मध्ये माणसाच्या बंधनांची, ‘मुठमाती’ मध्ये आयुष्याच्या कडवट वास्तवाची, ‘लिव्ह इन ते लिव्ह इट’ मध्ये बदलत्या जीवनशैलीची आणि ‘तिसरी पिढी’ मध्ये काळाच्या ओघातल्या विचारांच्या दरीची जाणीव करून देणारे आयाम आहेत. विशेष म्हणजे, डॉ. पाटील यांच्या लेखणीत वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाची जाण आणि सामाजिक वास्तवाचे भान दोन्ही ठळकपणे दिसते. त्यामुळे त्यांचे लेखन हे केवळ कल्पनाविलास न राहता वास्तवाची, संघर्षांची आणि भावनिक नात्यांची गुंफण ठरते. ‘कथाकंद’ हा संग्रह म्हणजे त्यांच्या साहित्यप्रवासातील नवे पर्व. एका ठिकाणी विखुरलेल्या कथांना संकलित करून वाचकांसमोर मांडण्याचा हा प्रयत्न केवळ कथा वाचण्यापुरता मर्यादित नसून, मानवी मनाचे असंख्य पैलू, समाजाचे वास्तव आणि स्त्री-पुरुषांच्या जगण्यातले कंगोरे यांचे दस्तऐवजीकरण ठरतो. डॉ. राजश्री पाटील यांच्या लेखनात प्रामाणिकपणा, वास्तवाचे दर्शन आणि भावनिक आवेग या तिन्हींचा सुंदर मिलाफ आहे. ‘कथाकंद’ हा संग्रह वाचकाला आयुष्याच्या विविध छटा दाखवतो. कधी कोवळ्या उन्हासारख्या ऊबदार, तर कधी काळ्या ढगांसारख्या दडपणाऱ्या. साहित्यप्रेमींसाठी हा संग्रह म्हणजे अनुभवांचा, विचारांचा आणि भावनांचा बहुरंगी कंदील, जो मनाच्या कोपऱ्यापर्यंत प्रकाश पेरतो. -दिलीप भोसले

RELATED BOOKS

₹150.00 ₹200.00 25% Off
₹300.00 ₹420.00 29% Off
₹80.00 ₹100.00 20% Off
₹30.00 ₹40.00 25% Off
₹120.00 ₹150.00 20% Off
₹150.00 ₹200.00 25% Off
₹80.00 ₹100.00 20% Off