Bhui Bhui Thav De

Bhui Bhui Thav De


Book Preview


₹200.00 ₹250.00
Price in USD: $2.12

शहरं वाढताना लगतच्या खेड्यास अल्लाद गिळतात. तेथील परंपरा, संस्कृतीसह त्यांच्या अस्तित्वाचं नामोनिशाण मिटलं जातं. तेथे ना शेती राहते, ना शेतकरी, ना शेतमजूर. नद्यांकाठची अत्यंत सुपीक, पिकाऊ भुई आपण नागरी वस्तीसाठी वापरली. वापरत आहोत. गुंठा गुंठा विकत भूमिहीन होणाऱ्या तेथील शेतकऱ्यांचं व शेतमजुरांचं पुढे काय होतं? झगमगाटी पेठांमध्ये त्यांचे चेहरे कोठेच दिसत नाहीत. अशाच नव्याने भूमिहीन झालेल्या, उद्ध्वस्त शेतकरी कुटुंबाची ही गोष्ट. काळीज हेलावून टाकणारी. स्थावरजंगम सारख्या वेगळ्या विषयावरची कदाचित मराठीतील ही पहिली कादंबरी असावी. व्यापक पट असला तरी, बांधकाम क्षेत्रातील दमनकारी शक्तीखाली पिचलेली पात्रं, घटना व प्रसंग त्यांच्या सेंद्रिय गुंफणीतून कादंबरी एकजिनसी ठेवण्यात सीताराम सावंत यशस्वी झाले आहेत. परंपरा व नवता यांचा सुरेख संगम या कादंबरीत दिसून येतो. तरल, हृदयस्पर्शी व अस्सल अनुभूती. रसरशीत भाषिक सौंदर्य. ग्रामीण, नागरी, प्रादेशिक अशा सर्व चौकटी भेदून पुढे जाणारी ही महत्त्वाची कादंबरी वाचकांना समृद्ध बनवते. कादंबरी वाचून झाल्यावर वाचक त्याच्या मनःपटलावर नव्याने काही लिहू लागतो.

Read More

RELATED BOOKS

₹150.00 ₹215.00 30% Off
₹350.00 ₹545.00 36% Off
₹100.00 ₹410.00 76% Off
₹150.00 ₹200.00 25% Off
₹100.00 ₹120.00 17% Off
₹100.00 ₹150.00 33% Off