Kalijbhet

Kalijbhet


Book Preview


₹40.00 ₹60.00
Price in USD: $0.46

सामान्यांच्या मूक भावनांना बोलके करणाऱ्या आंबेडकरी विचारधारेतील कवींपैकी रवींद्र शिंदे हे एक नवक्रांतीकारी कवी होत. ऐन उमेदीत इंजिनिअरिंगचं उच शिक्षण घेणारा, चित्रपटसृष्टीत नव्याने पदार्पण केलेला त्यांचा मुलगा चि. प्रशांत किडनीच्या विकारानं कालवश झाला. त्याचं हे अचानक जाणंच त्यांच्या या 'काळीजभेट'चे खास प्रयोजन होय. असे असले तरी समाजव्यवस्थेला नागवणारी परकीय आर्य संस्कृती, पुराणाला प्रमाण मानून अबलांना विवस्त्र करू पाहणारे धर्मवेडे, समाजाचे जात्यंध ठेकेदार, विषमतेची कुजट पाळेमुळे, अंधश्रद्धेपोटी आत्मविश्वास गमावलेला दुबळेपणा, या विरुध्दचा विद्रोह आणि नकार 'काळीजभेट'च्या शब्दा- शब्दांतून अविष्कृत होताना दिसतो आहे. आजपर्यंतच्या दलित काव्यामध्ये, सामाजिक विद्रोह, निसर्गप्रेम आणि सखीचं प्रेम व तिचा लावणी शृंगार असा त्रिवेणी संगम कधीच पहावयास मिळालेला नाही; परंतु 'काळीजभेट' मधून सामाजिक विद्रोहाबरोबरच निसर्ग आणि सखीचं प्रेम व लावणी शृंगाराच्या इंद्रधनुषी चित्रमय झालरी दृष्टीपटलावरून पुढे सरकत मनाला भुरळ घालून जात आहेत. दलित काव्यामध्ये हा प्रयोग प्रथमच आकार घेतो आहे आणि हेच त्यांचे खास वैशिष्ट्य होय. 'काळीजभेट' मधील या नाविण्यपूर्ण प्रयोगामुळे, दिवसेंदिवस बोथट होऊ' पाहणाऱ्या मानवी संवेदना जागृत होऊन सामान्य माणसाला, उठण्याचं, अन्यायाविरुद्ध लढण्याचं, स्वअस्तित्व अबाधित राखण्याचं बळ निश्चितच मिळेल. यातील विद्रोह, प्रेमकाव्य, निसर्ग काव्य, शृंगार लावणीचा साज आणि बाजाचा नवखा प्रयोग, सर्वांना हवाहवासा, आपलासा वाटेल. बहुजनांचे विद्रोही साहित्यातही या नवख्या प्रयोगास अधिष्ठाण मिळेल याबद्दल आत्मविश्वास वाटतो. प्रा. अशोक खंडागळे पाटोल संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा

RELATED BOOKS