रवींद्र शिंदे या हुन्नरी लेखकाने कला संस्कृतीच्या साहित्याच्या क्षेत्रात काही एका धडपडीतून व्यक्त होण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. त्यांना नाटक, चित्रपट या माध्यमांचेही आकर्षण आहे. कविता, कथा, नाटक आदी लेखन प्रकार त्यांनी हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. ग्राम पर्यावरणाने त्यांच्या व्यक्तीमत्वाचे भरण-पोषण केलेले आहे. ज्या कुटुंब आणि सामाजिक देण्यातून भाषिक संस्करण झालेले आहे. त्याच्याशी इमान प्रमाण राहून शिंदे यांनी आपला अनुभवस्तर या कथातून शब्दांकित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. - प्रा. भास्कर चंदनशिव