बालपणापासून जोपासलेला लेखनाचा माझा छंद टप्या-टप्यानं फुलत गेला. विकसित झाला. नानविध विषयावर लेखन करण्याची उनी मिळत गेली. माझ्या गुरूवर्याचे व लग्नानंतर पर्तीचे मार्गदर्शन लाभले माझी लेखनशैली फुलत गेली. उदयास आली. माझ्या या यशामध्ये ज्यांनी ज्यांनी मला मार्गदर्शन केले. त्या दृश्य अन् अदृश्य शक्तिला मी शतशः प्रणाम करते. सुप्रसिद्ध लेखक-कवी यांच्या कथा कादंबऱ्यातून उस्फूर्त ज्ञान मिळाले. लेखन शैली मिळत गेली. अन् माझ्या ज्ञानात भर पडत गेली त्यापैकी ज्ञात असलेल्या व अज्ञात असलेल्या थोर साहित्यकांना माझे शतश प्रणाम. माझे आजोबा-आजी-आई यांच्याकडून मला लोककथा- आख्यायिका, उखाणे, जात्यावरील ओव्या, या तोंडी साहित्याचा ठेवा मिळाला. या त्यांच्या अमोल देणगी बद्धल मी त्यांची सदैव ऋणी आहे. आज ते हयात नाहीत पण या अदृश्य शक्तिंची वारंवार जाणीव होते. स्मरण होते. या शक्तींना माझे शतशः दंडवत. निसर्ग हा मानवाचा सर्वश्रेष्ठ गुरू आहे. हे आपण सर्व जाणतोच या निसर्गाचे घटक डोंगर पर्वत दऱ्या खोरी सागर-सरिता, आकाश तारे, पाऊस, वारा, झाडे, वेली, तृण पशु-पक्षी मी यांना सर्वश्रेष्ठ गुरू मानते त्यांच्यापासून मला लेखनाची उर्मी मिळाली. दिव्य असे बोधामृत व मोलाचे संदेश मिळाले. या निसर्ग गुरूंना वंदन करून कोटी कोटी प्रणाम करते. पुनश्च ज्ञात-अज्ञात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद. समाजात घडणाऱ्या प्रसंगांचा आधार घेऊनच मी माझ्या कथांना कल्पकतेचा साज चढविला आहे. यदाकदाचित काही प्रसंगाशी आपले साम्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजून गैरसमज टाळावा ही वाचकवर्गाना नम्रतेची विनंती करून मनःपूर्वक धन्यवाद देते.