'निर्धार' मधील कथा भारतीय संविधानिकतेचा आग्रह धरतात. न्याय हक्काचा विचार मांडतात. सांविधानिक मार्गाने प्रश्न सोडविण्याची दृष्टी देतात. रुढ दलित कथेतील आशयाला नवा संदर्भ देतात. बौद्ध विचारसरणीचा पुरस्कार केल्यामुळे पुढील सांस्कृतिक चळवळीचे साधन पुरवितात. केवळ चिंतन आणि वैचारिकतेत जयराज खुने यांची कथा आडकत नाही. कृतिशीलतेची पायरी ती गाठते. परिवर्तनाची व्यापकता स्वीकारण्यास कथाकार भाग पाडतो. भारतीय सांविधानिक जाणिवेमुळे होणारा संघर्ष मांडताना सांविधानिक मार्गाची महत्तता मांडतात. त्यामुळे जयराज खुने यांची कथा दलित कथेचा पट विस्तारुन पुढे जाते. - प्रा. डॉ. गिरीश मोरे