Antarnad

Antarnad


Book Preview


₹200.00 ₹240.00
Price in USD: $2.35

सौ. वृंदा कांबळी या मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील आणि प्रतिभावान लेखिका आहेत. त्यांच्या लेखनप्रवासाचा गौरव करताना त्यांच्या साहित्याने दिलेल्या भावस्पर्शी अनुभवांबद्दल नोंद घेणे अपरिहार्य आहे. ‘अंतर्नाद’ हा त्यांचा चौथा कथासंग्रह असला तरी एकूण नववी प्रकाशित साहित्यकृती आहे. विविध विषयांवरील कथा, त्यांच्या कलात्मकतेच्या प्रगल्भ जाणिवा आणि लेखनाच्या प्रेरणाशक्तीचे दर्शन या कथासंग्रहात होते. लेखिकेने आपल्या लेखणीच्या माध्यमातून मानवी आयुष्याचे विविध पदर अतिशय हृदयस्पर्शीपणे मांडले आहेत. या कथा संग्रहाच्या निर्मिती मागील लेखिकेची संवेदनशीलता, कलात्मकता, आणि मनातील नाद स्पष्टपणे जाणवतो. ‘अंतर्नाद’ या कथासंग्रहातील कथा जीवनातील अनेक भावनिक, सामाजिक आणि मानसिक पैलूंवर प्रकाश टाकतात. यामध्ये जीवनातील संघर्ष, प्रेम, नात्यांतील तणाव, मानवी नात्यांची गुंतागुंत, स्त्रीवादाचे मूक दर्शन, तसेच आत्मशोध यांसारख्या विविध विषयांना कवेत घेतले गेले आहे. लेखिकेच्या मते, कथा म्हणजे त्यांच्या मनातील अंतर्नाद आहे, जो त्यांच्या संवेदनशीलतेतून आणि अनुभवांतून साकार झाला आहे. या कथांमधील व्यक्तिरेखा जशा कल्पनाविलासातून जन्म घेतात तशाच वास्तवाशीही त्यांचे घट्ट नाते असते. ‘अंतर्नाद’ हा कथासंग्रह वाचकांना मानवी मनाच्या गाभ्याला भिडणारा अनुभव देतो. सौ. वृंदा कांबळी यांचे लेखन हे केवळ मनोरंजनासाठी नसून वाचकांना अंतर्मुख करणारे आहे. त्यांच्या कथांमधील विविध व्यक्तिरेखा, प्रसंग आणि संवाद हे वाचकांना अंतःकरणातून स्पर्शून जातात. त्यांचा हा कथासंग्रह वाचकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करेल यात शंका नाही. साहित्याच्या क्षेत्रात त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करणे अगत्याचे ठरते.

RELATED BOOKS